पोटाचे विकार आणि होमियोपॅथी सतात. इंग्रजी मधे एक म्हण आहे - यु आर व्हाट यू इट, म्हणजेच तुम्ही जे खाता त्यावरून तुमची ओळख ठरते. अगदी शब्दशः नाही तरी काही अंश हे खर आहे. आपण जे खातो त्याचे पचन होउन ते शौचा वाटेबाहेर टाकले जाते. मेडिकल पुस्तकामध्ये पचनाचे ५ टप्पे दिले आहेत. )Ingestion -अन्न अगर औषध पोटात घेणे २) obsorption - अन्न शरीरात शोषून घेणे ३) Digestion - अन्नाचे पचन होणे .assimilation-एकरूपता ( अन्नाचे घटक ज्या त्या पेशींना पाचवणे) Excretion- मल बाहेर टाकणे सगळ्या क्रिया रोजच्या रोज पोट साफ होण्यासाठी गरजेच्या असतात. या लेखात पोटाच्या तक्रारी म्हणजे पित्त, गॅसेस बहकोष्टता, सारखी शौचाला होणे, कितीही वेळा गेल तरी पोट नसाफ़ झाल्यासारखे वाटणे, पोटात दुखणे, आणि बरेच वरील ५ क्रियान्मधे गड़बड़ झाल्याने होऊ शकतात. असे दुखणे कायम चालू राहिले तर त्याचे परिणाम म्हणजे - पोटाचा किंवा अताडयाचा अलसर, अताडयाला आतून सूज येणेपाइल्स, फिशर, फिस्चुला सारखे आजार मागे लागू शकतात. होमियोपॅथीमधे आजार मुळापासून नष्ट केला जातो, हे आता जगजाहिर आहे. वरील तक्रारींचं मूळ शोधून त्यावर योग्य वेळी योग्य ते उपचार केले गेले, तर पुढे होणारे आजार टळू शकतात.पित्त- सतत घशामधे किंवा छातिमधे जळजळ, अन्न वर येणे, मळमळणे, ढेकर येणे, तोंडाची चव आंबट होणे, डोक दुखणेबऱ्याच लोकांना घशात बोटे घालून उलटी काढण्याची सवय असते. उलटी झाल्या नंतरच त्यांना आराम मिळतो. असे करणे एकदम चुकीचे आहे. कधीकधी खुप दिवस कोरडा खोकला राहिला, तर त्याचं कारण सुद्धा पित्त असू शक्त. खाल्ल्या खाल्ल्या लगेच आडवे झाल्याने वर येउन घशाला इजा पोचवतो व त्यामुळे कोरडा खोकला होऊ शकतो. त्याला मेडिकल भाषेमध्ये GERD किंवा reflux म्हणतात. कधीकधी पित्ताशायाला सूज आल्यामुळे किंवा पित्ताशा मधे खड़े झाल्याने सुद्धा हा तरस होऊ शकतो. सारख्या पित्ताच्या उलट्या झाल्याने, किंवा अती तिखट मसालेदार खाल्ल्याने, अन्ननलिकेला व लहान आतडयाला आतून जखम होउन अलसर होऊ शकतो. गॅसेस- पोट फुगणे, पोट जड होणे,, पोट दुखणे, ढेकर येणे, अपानवायु.आपण जे खातो त्या अन्नाबरोबर काही अंशतः पोटात जाते. चुविंग गम, सोडा युक्त पेय, भरभर खाणे, सिगरेट ओढणे, किंवा वयोवृद्ध लोकांमधे सैल कवळी बसणे, वरून पिणे या सर्व कारणांमुळे जास्त हवा पोटात जाऊन गॅसेस होऊ शकतात. गॅसेस चे दुसरे कारण म्हणजे - खाल्लेल्या जड अन्नाचे ( कर्बोदके, फायबर, साखर जास्त प्रमाणात असलेल्या) पोटामधे व अताडया मधे अर्धवट पचन होउन ते मोठ्या अताडया मधे जाते. तिथे जीवाणुच्या मदतीने अन्नाचे पूर्ण पचन होते ज्यावेळी तयार होतात. . बहकोष्टता- (constipation)- शौचाला नियमित न होणे, दर एक किंवा दोन दिवसांनी शौचाला होणे, कडक संडास खड़ा होणे, जोर करावा लागणे (कुंथावे लागणे). कधीकधी तर संडास बाहर न येता गुदद्वारात अडकून बसते (stool impactionअशावेळी दवाखान्यात जाऊन एनीमा किंवा बोट घालून शौच बाहेर काढावे लागते. विशेषतः वृद्धान्मधे हे खुप दिसून येतेstool impaction हे खूप त्रासदायक असते कारण हे वारंवार होत राहते व प्रत्येक वेळी दवाखान्यात नेणे शाक्य होत नाहीमग एलॉपथीमध्ये संडास पात्तळ होण्याची औषधे दिली जातात (laxative- duphalac, cremaffin इत्यादी) जी खुप दिवस योग्य नसते व जास्त दिवस घेतल्याने थोड्या दिवसांनी त्याचा परिणाम होईनासा होतो. हार्टचा त्रास असलेल्यांना (एंजियोप्लास्टी बायपास झालेल्यांना) जी औषधे चालु असतात त्याचे दुष्परिणाम म्हणून पण कडक संडास होते. अशावेळी कुंथले/जोर हार्ट वर प्रेशर येउन बेशुद्ध पडायची वेळ येऊ शकते. याचे परिणाम म्हणजे पाइल्स (कोम्ब), फिशर, फिश्चूला सारखे आजार मागे लागतात. संडास वाटे रक्त जाणे, संडास करताना प्रचंड वेदना व सूरी चालवल्यासारखे, टोचल्यासारखे दुखणे, चीरा पडणे, शौचाला जाऊन आल्यावर बसता न येणे. यावर मधे उपाय एकच - शस्त्रक्रिया ! ती झाली तरी आजार पुन्हा होणार नाही याची शाश्वती नाही. . वारंवार शौचाला जावे लागणे- सकाळी उठल्या उठल्या बाथरूम मधे धाव घेणे, थोड़ी थोड़ी संडास होणे , व पूर्ण झाल्याची भावना नसणे. खरे म्हणजे याला आपण 'कोठा हलका आहे ' असे म्हणतो. जुलाब होत नाहित पण दिवसातून २-३ वेळा जावे लागते. काही धोका नाही. पण पोट साफ़ झाल्यासारखे वाटले नाही तर मात्र काहीतरी गड़बड़ असते. भावना होते पण संडास होत काही लोकांना, कधी पात्तळ तर कधी कड़क संडास होते. याला आम्ही "IBS' म्हणजे 'iritable bowwel syndrome' म्हणतोअशा लोकांना कुठेही जायचे असले , किंवा भाषण करायचे असले, इंटरव्यू द्यायचा असल्यास, कुठलाही प्रयोग किंवा परफॉरमन्स असल्यास शौचाला जायची भावना होते. -Anxiety म्हणजे भीतीमुळे येणारी ही भावना असते. व्यतिरिक्त अजुन एक आजार पण जो सर्व सामान्यांमधे इतका आढळत नाही तो म्हणजे "Inflammatory bowel diseaseम्हणजे सोप्या भाषेत - अताडयाला आवरणाला आतून सूज येणे. पोटात सतत दुखत राहणे, सारखे जुलाब होणे, वजन कमी होणे, अंगातील रक्त कमी होणे , थकवा अशी याची लक्षणे असतातएक अनुवांशिक आजार असून त्यावर योग्य उपचारांनी त्रास कमी होऊ शकतो. सगळ्यासाठी होमियोपॅथी मधे सर्वोत्तम औषधे आहेत, ज्यांचा काही दूसरा दुष्परिणाम नाही. मोठे भयानक वाटणारे हे अगदी अलगद, हळुवारपणे व सहजरित्या होमियोपॅथी दूर करू शकते
पोटाचे विकार आणि होमियोपॅथी