डॉ. आंबेडकर यांचं इंदू मिल येथील स्मारक दोन वर्षात उभं राहणं शक्य : शरद पवार मुंबई

 मुंबई : डॉ. आंबेडकर यांचं इंद मिल येथील स्मारक येत्या दोन वर्षांमध्ये उभं राहणं शक्य आहे असं मत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. गर्दीच्या काळातही स्मारकाची काळजी घ्यावी लागेल. या स्मारकाला आणखी विलंब होऊ नये अशी याची काळजी घ्यावी लागेल असाही सल्ला शरद पवार यांनी दिला. न्यूयॉर्कमधे गेल्यावर आंबेडकर यांचं इंदू मिल जसे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहण्यासाठी लोक जातात अगदी तसेच इंद मिलमधे डॉ. आंबेडकर यांचं स्मारक पाहण्यासाठी लोक आले पाहिजेत असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. आज राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी इंद मिल येथील जागेची पाहाणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली मतं मांडली. स्मारकाचं २५ टक्के काम पूर्ण झालं आहे. ७५ टक्के काम बाकी आहे. ज्या आलं आहे ती आंतरराष्ट्रीय कंपनीकडे हे काम देण्यात पातळीवर काम करणारी वर्षात उभं संस्था आहे. त्यांनी मनापासून ठरवलं आणि कोणत्याही संमतीचा विषय उरला नाही तर दोन वर्षात हे स्मारक उभं राहणं शक्य आहे असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. हे स्मारक असं झालं पाहिजे की याचं आकर्षण जगभरातल्या पर्यटकांना वाटावं. चैत्यभूमी आणि स्मारक पाहिल्याशिवाय कुणीही परत जाणार नाही असं स्मारक व्हायला हवं असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं.