जागतिक दिवसः महत्त्वाच्या घटनाः १९९९ लता मंगेशकर व पंडीत भीमसेनजोशी 'पद्म भूषण' पुरस्कार व सचिन तेंडुलकर, सुलोचना यांना 'पद्मश्री' पुरस्कार मिळाला. १९९९ : पं. भीमसेन जोशी व लता मंगेशकर यांना पद्मविभूषण' सन्मानाने गौरविण्यात आले. १९९९ : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री सुलोचना यांना ‘पद्मश्री' सन्मान प्रदान करण्यात आला. १९९८ : अभिनेते दिलीपकुमार यांना 'निशान-ए-इम्तियाज' हा पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर १९८० : प्रकाश पदुकोण याने ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला भारतीय आहे. १९५६ : पाकिस्तानहे जगातील पहिले इस्लामी प्रजासत्ताक बनले. १९४० : संपूर्ण स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीचा ठराव लाहोर येथील मुस्लीम लीगच्या अधिवेशनात संमत १९३१ : सॉन्डर्सचा वध करणाऱ्या भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. जन्मदिवस जयंती/वाढदिवसः १९१० : डॉ. राम मनोहर लोहिया. १९२६ : रविंद्र पिंगे. १९६८ :माईक अॅथरटन – इंग्लिश क्रिकेटपट्र १९५३ : किरणमुजूमदार शॉ – भारतीय महिला उद्योजक १९३१ : व्हिक्टर कॉर्चनॉय – रशियन बुद्धीबळपटू १९२३ : हेमू कलाणी- क्रांतिकारक (मृत्यू:२१ जानेवारी १९४३) १९१६ : हरकिशन सिंग सुरजित – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व पॉलिट ब्यूरोचे सदस्य (मृत्यू: १ ऑगस्ट २००८) । १९१० : डॉ. राम मनोहर लोहिया – समाजवादी नेते, विख्यात संसदपट, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक.१९३२ मधे 'मिठाचा सत्याग्रह' या विषयावरील प्रबंधाकरता त्यांना बर्लिन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली. इंग्रजीचे ते उत्तम जाणकार होते . मात्र त्यांना इंग्रजीची गुलामी मान्य नव्हती. इंग्रजी येत असुनही 'अंग्रेजी हटाओं ही चळवळ त्यांनी चालविली होती. (मृत्यू: १२ आक्टोबर १९६७) मृत्यू / पुण्यतिथी/स्मृतिदिनः २०११ : एलिझाबेथ टेलर – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री (जन्म: २७ फेब्रुवारी १९३२) २००८ : गणपत पाटील - मराठी चित्रपट कलाकार (जन्म: १९१८?) १९३१ :भगत सिंग – क्रांतिकारक (जन्म:२८ सप्टेंबर १९०७) १९३१ : 'सुखदेव थापर – क्रांतिकारक (जन्म: १५ मे १९०७) १९३१ : शिवराम हरी 'राजगुरू' – क्रांतिकारक (जन्म: २४ ऑगस्ट १९०८)
दिनविशेष